शनिवारी अशा गोष्टी भाग्यवान लोकांनाच दिसतात
आठवड्यातील सात दिवसांपैकी शनिवार हा शनिदेवाला समर्पित करण्यात आला आहे.
शनीची अशुभ छाया ज्याच्यावर पडते त्याचे कोणतेही कार्य सफल होऊ शकत नाही.
जर तुम्हाला शनिवारी काही खास गोष्टी दिसल्या तर याचा अर्थ शनिदेवाची तुमच्यावर कृपा राहणार आहे.
ज्योतिष शास्त्रानुसार जर तुम्हाला शनिवारी काळा कुत्रा दिसला तर तो खूप शुभ संकेत मानला जातो.
शनिवारी काळ्या कुत्र्याला तेल लावलेली भाकरी खाऊ घातली तर राहू आणि केतूची कृपा तुमच्यावर राहते, असे मानले जाते.
ज्योतिष शास्त्रानुसार जर तुम्हाला शनिवारी कुठे बाहेर पडताना भिकारी दिसला तर त्याला रिकाम्या हाताने जाऊ देऊ नका.
भिकाऱ्याला तुमच्या क्षमतेनुसार काहीतरी दान नक्की करा. असे केल्याने शनिदेव प्रसन्न होतात आणि तुमच्यावर कृपा करू शकतात.
ज्योतिष शास्त्रानुसार जर एखाद्या व्यक्तीला शनिवारी काळी गाय दिसली तर तो शुभ संकेत मानला जातो. याचा अर्थ शनिदेव तुमच्यावर प्रसन्न होणार आहेत
जर एखाद्या व्यक्तीला शनिवारी कावळा पाणी पिताना दिसला तर हे त्याचे नशीब चमकणार असल्याचे लक्षण आहे.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
–