शनिदेवाची या राशींवर असते विशेष कृपा

ज्योतिषशास्त्रात शनी ग्रहाला क्रूर ग्रह मानले जाते, शनीच्या वक्रदृष्टीला सगळेच घाबरतात.

शनी कर्मानुसार फळ देतो. शनि ग्रहाचा स्वभाव सत्याचे अनुसरण करणे आहे.

प्रत्येक मनुष्याच्या चांगल्या-वाईट कर्मांचा हिशेब शनिदेव करत असतो, असे मानले जाते.

 शनिदेवाला कलियुगातील न्यायदंडाधिकारी किंवा न्यायाधीश म्हणूनही ओळखले जाते.

बहुतेक लोक शनीची साडेसाती अशुभ मानतात, परंतु हे पूर्णपणे चुकीचे आहे.

काही राशींवर शनीदेव नेहमी मेहरबान असतात

कुंभ : या राशीला शनी शुभ परिणाम देतो. शनिकृपेने प्रत्येक कामात यश मिळते.शनिदेवाच्या आशीर्वादाने धनाची प्राप्ती होते.

मकर : या राशीवर शनीचा अशुभ प्रभाव पडत नाही. कुंडलीत शनि शुभ स्थितीत असतो तेव्हा राशीला सर्व कार्यात यश मिळते.

तूळ: या लोकांवर शनिदेवाची असीम कृपा असते. या लोकांना जीवनात अडचणी आल्या तरी त्या फार काळ टिकत नाहीत.

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)