वसंत पंचमीला शनि बदलणार आपली चाल; 3 राशींसाठी ठरणार सुवर्णकाळ
पंचांगानुसार, न्यायाची देवता शनि वसंत पंचमीला, म्हणजेच 2 फेब्रुवारीला सकाळी 8.51 वाजता पूर्वाभाद्रपद नक्षत्राच्या द्वितीय भावात प्रवेश करेल.
हा काळ 3 राशींसाठी भाग्याचा ठरेल, या काळात या 3 राशींचं नशीब उजळू शकतं, सुख-संपत्तीत वाढ होऊ शकते.
कन्या या राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात उत्तुंग यश मिळू शकतं, तसेच खूप मान-सन्मान मिळू शकतो. तुमची प्रदीर्घ प्रलंबित कामं या काळात पूर्ण होऊ शकतात.
यासोबतच तुमचं काम आणि समर्पण पाहून अधिकारी तुमच्यावर प्रभावित होऊ शकतात. वरिष्ठ अधिकाऱ्यांचंही तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल.
कुंभ कुंभ राशीच्या लोकांसाठी शनीचं नक्षत्र परिवर्तन भाग्याचं ठरू शकतं. या राशीच्या लोकांची प्रदीर्घ प्रलंबित कामं पूर्ण होऊ शकतात. यामुळे तुमच्या संपत्तीमध्ये झपाट्याने वाढ होऊ शकते.
तुमचं आरोग्य या काळात चांगलं राहील. या काळात मानसिक तणावातून तुम्हाला आराम मिळू शकतो. कुटुंबासोबत तुमचा चांगला वेळ जाईल.
मीन शनीचं नक्षत्र परिवर्तन मीन राशीच्या लोकांसाठी आनंददायी ठरेल. या राशीच्या लोकांना अनपेक्षित आर्थिक लाभ होऊ शकतो. उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडू शकतात.
अशा परिस्थितीत, तुमची आर्थिक स्थिती चांगली असू शकते. आर्थिक लाभासोबत बचत करण्यातही तुम्ही यशस्वी होऊ शकता.
येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. News18 मराठी याचा दावा करत नाही.