दुसरा श्रावण सोमवार आहे खास! जुळलाय दुर्मिळ योग

श्रावणातील अंत्यत महत्त्वाचे मानले जाणारे प्रदोष व्रत सोमवार, 28 ऑगस्ट रोजी आहे.

या दिवशी प्रदोष व्रतात 5 शुभ संयोग तयार होत आहेत.

त्या दिवशी श्रावण सोमवार तर आहेच शिवाय आयुष्मान योग, सौभाग्य योग, सर्वार्थ सिद्धी योग आणि रवि योग यांचा दुर्मिळ शुभ संयोग आहे.

प्रदोष शिवपूजा सौभाग्य योगात होईल. प्रदोष व्रत सर्व प्रकारचे दोष दूर करून मनोकामना पूर्ण करणारे मानले जाते.

श्रावण सोमवार आणि प्रदोष व्रताचा मिलाफ जुळला आहे, त्यामुळे हा दिवस रुद्राभिषेकासाठी अतिशय शुभ आहे.

श्रावण शुक्ल पक्षाची त्रयोदशी तिथी 28 ऑगस्ट रोजी सायंकाळी 06:48 ते मंगळवार 29 ऑगस्ट दुपारी 02:47 पर्यंत आहे.

प्रदोष पूजेसाठी सूर्यास्तानंतरची वेळ महत्त्वाची असते. त्यामुळे 28 ऑगस्ट रोजीच सूर्यास्तानंतरचा शुभ मुहूर्त उपलब्ध आहे,

28 ऑगस्ट रोजी प्रदोष व्रत पूजेचा शुभ मुहूर्त संध्याकाळी 06:48 ते रात्री 09:02 पर्यंत आहे.

शिवपूजेसाठी दोन तासांपेक्षा जास्त वेळ मिळेल. दिवसा प्रदोष व्रताची पूजा केली जात नाही,

त्रयोदशी तिथीला प्रदोष काळात भगवान शिव कैलासावर प्रसन्न मूडमध्ये असतात. त्यावेळी उपासना केल्याने व्रताचे पूर्ण फळ मिळते.