श्रावणी मंगळवार, आज मंगळा-गौरी पूजन

श्रावणातील मंगळवार हा एक अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो.

या दिवशी मंगळागौरीचं व्रत करण्याची परंपरा आहे.

मंगळा-गौरी हे सौभाग्य प्राप्तीसाठी केले जाणारे व्रत आहे.

श्री गौरी म्हणजेच शिव-पार्वतीची पूजा करणे.

विशेषत: नवीन लग्न झालेल्या मुली हे व्रत  करतात.

सख्यासह भोजन, खेळ इत्यादी करून हे व्रत केलं जातं व नंतर उद्यापन करतात.

लग्नानंतर पहिली 5 वर्षे हे व्रत करावं असं सांगितलं जातं.

श्रावण महिन्यात येणाऱ्या प्रत्येक शुक्रवारी जरा जिवंतिका पूजन करण्याची प्रथा आहे.

घरातील तान्ह्या बाळाचे रक्षण जिवती आई करते, असे मानले जाते.

येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.