महाकुंभच्या मुहूर्तावर उघडणार नशिबाचे दार, या ३ राशींचा गोल्डन टाइम होणार सुरु

प्रयागराजमध्ये सुरू होणारा महाकुंभ मेळावा 2025 हा अनेक अर्थाने खास आहे. कारण यावेळी तब्बल 144 वर्षांनंतर ग्रहांचा दुर्लभ योग बनत आहे.

हा महाकुंभ मेळावा यासाठी खास आहे कारण या मुर्हूतावर सूर्य,चंद्र, शनि आणि बुध या ग्रहांची शुभ स्थिती बनत आहे.

यासोबतच महाकुंभासोबत, पोर्णिमा, रवी योग आणि भद्रवास योगाची देखील निर्मिती होणार आहे.

144 वर्षांनंतर निर्माण झालेल्या या दुर्मिळ योगाचा प्रभाव हा वेगवेगळ्या राशींवर वेगवेगळा पडणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार काही राशींवर या योगाचा खूपच शुभ प्रभाव पडणार आहे.

महाकुंभाच्या मुहूर्तावर तीन राशींचा गोल्डन टाइम सुरू होण्याचे संकेत मिळत आहेत,जाणून घेऊयात या तीन राशींबद्दल.

मेष राशींच्या लोकांसाठी कुंभ स्नानाचा हा योग खूपच शुभ राहणार आहे. या काळात ग्रहांची जी स्थिती बनत आहे, त्यामुळे या राशींच्या लोकांना त्यांच्या मेहनतीचं योग्य ते फळ मिळणार आहे.

सिंह राशीला देखील हा कुंभमेळ्याचा शुभ योग खूप फायद्याचा ठरणार आहे. नवीन संधी मिळू शकतात. मानसिक समाधान मिळेल. सिंह राशीच्या लोकांना करिअरमध्ये मोठं यश मिळेल.

मकर राशीसाठी सुद्धा हा एक दुर्मिळ योग आहे. नातेसंबंधातील कटूता दूर होऊन नातेसंबंधामध्ये गोडवा निर्माण होईल.तसेच नोकरीमध्ये आणि व्यवसायात देखील फायदा होऊ शकतो.

वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल News18 मराठी कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.