या गोष्टी सूर्यास्तानंतर चुकूनही करून नये 

हिंदू पौराणिक कथेनुसार, देवी लक्ष्मीचा आशीर्वाद राहण्यासाठी रात्रीच्या वेळी काही गोष्टी टाळल्या पाहिजेत.

माता लक्ष्मीला धन आणि ज्ञानाची देवता मानलं जातं. तिला संतुष्ट करण्यासाठी, घरात काही गोष्टी योग्यपणे होणे गरजेचे असते.

हिंदू श्रद्धेनुसार, काही वाईट सवयी आहेत, ज्या टाळल्या पाहिजेत, कारण यामुळे देवी दुःखी होऊ शकते आणि आर्थिक समस्या निर्माण होऊ शकतात.

महिलांनी रात्री केस मोकळे सोडून झोपू नये, सूर्यास्तानंतर नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव त्यांना मारक ठरू शकतो.

स्वयंपाक घरात झोपताना खरखटी भांडी कधीही ठेवू नये, असं केल्यानं घरात गरिबी आणि कायमचे कर्ज होते.

सूर्यास्तानंतर दूध, हळद, मीठ आणि आंबट पदार्थ दान करू नयेत. आर्थिक समस्या आणि जीवनात अस्थिरतेचा सामना करावा लागू शकतो.

असं मानलं जातं की रात्री नखं आणि केस कापणे हे अशुभ आहे.

असे मानले जाते की, सूर्यास्तानंतर झाडू वापरणे शुभ नाही. कुटुंबाचे आरोग्य, आनंद आणि शांतीशी संबंधित गोष्टींवर परिणाम होतो. 

असे मानले जाते की, सूर्यास्तानंतर उघड्या आकाशात कपड्यांमध्ये नकारात्मक ऊर्जा पसरते. त्यामुळे रात्री कपडे धुवून वाळवू नये.