तुळशी आणि मनी प्लांट पेक्षाही अधिक लकी हे प्लांट; घरात ठेवताच वाढेल बँक बॅलन्स
अनेकदा तुम्ही लोकांना घरात तुळशी आणि मनीप्लांटची रोपे ठेवताना पहिले असेल, हे घरात ठेवल्याने धनाचा ओघ वाढतो अशी मान्यता आहे.
पण तुम्हाला माहिती आहे का की वास्तुशास्त्रात आणखी एका वनस्पतीचा उल्लेख आहे, ज्याला खूप शुभ मानले जाते.
या वनस्पतीला ‘मनी ट्री’ किंवा ‘जेड प्लांट’ असेही म्हणतात. ही वनस्पती घरात ठेवणे खूप शुभ मानले जाते.
असे म्हणतात की याची गोलाकार पाने संपत्ती आणि समृद्धीचे प्रतीक आहेत.
ज्योतिषशास्त्रानुसार, ही वनस्पती चंद्र आणि शुक्र यांच्याशी संबंधित आहे, ज्यामुळे घरात सुख शांती येते.
याच्या पानांचा आकार नाण्यांसारखा असल्याने आर्थिक स्थैर्य येते असं म्हणतात. हे नकारात्मक ऊर्जा नष्ट करते.
वास्तुशास्त्रानुसार घराच्या, उत्तर, ईशान्य किंवा पूर्व दिशेला हे रोप ठेवणे फायदेशीर ठरते.
याशिवाय तुम्ही हे रोप मुख्य प्रवेशद्वार, लिविंग रूम किंवा घरातील कोणत्याही मोकळ्या जागेवर ठेवू शकता.
येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. News18 मराठी याचा दावा करत नाही.