दररोज रात्री आपल्याला स्वप्न पडतात. त्यातील काही लक्षात रहातात. तर काही आपण विसरतो.
काही स्वप्नांचे अर्थ आपल्याला लागत नाही, ज्यामुळे आपण विचार करत बसतो की असं स्वप्न मला का पडलं असेल?
पण यासगळ्यात आणखी एक स्वप्न माणसाला पडतो तो म्हणजे कुठून तरी पडण्याचं.
हे स्वप्न इतकं खरं वाटतं की माणूस दचकून जागा होतो. पण असं स्वप्न आपल्याला का पडतं?
एक्सपर्ट्सच्या मते, प्रत्येक स्वप्नाचा वेगळा अर्थ असतो. जर तुम्ही स्वप्नात स्वत:ला उंचावरून पडताना पाहत असाल, तर ते तुमच्या आयुष्यातील एखाद्या समस्येची किंवा नातेसंबंधातील तणावाची सूचना देऊ शकते.
काही वेळा, स्वप्नात तुम्ही पडताना कोणतीतरी वस्तू पकडण्याचा प्रयत्न करत असाल, तर त्याचा अर्थ असा की तुमच्या नात्यांमध्ये काही तणाव आहे आणि तो सुधारण्याची गरज आहे
जर तुम्ही स्वप्नात स्वत:ला पर्वतांपासून पडताना पाहत असाल, तर याचा अर्थ तुमच्या आयुष्यात एखाद्या कठीण प्रसंगाचा सामना होत आहे.
परंतु जर तुम्ही पडतांना पुन्हा जमीनपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असाल तर तो आत्मचिंतनाचा आणि समस्यांवर मात करण्याच्या इच्छेचा संकेत असतो.
स्वप्नांचे अर्थ सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही प्रकारचे असतात. काही स्वप्न तुमच्या धनसंपत्ती, यश आणि समाधानाची सूचना देतात, तर काही स्वप्न अशुभ परिस्थिती किंवा अपयशाची चिन्हे असतात.
(नोट : वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहे. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आमचा उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)