2025 वर्षातील महाशिवरात्री नेमकी कधी असणार?

हिंदू धर्मानुसार, महाशिवरात्रीचा दिवस हा भगवान शंकराला समर्पित आहे. यंदाची महाशिवरात्री खास असणार आहे.

या दिवशी कोणते योग जुळून येणार आहेत जाणून घेऊयात.

2025 नवीन वर्षातील महाशिवरात्री 26 फेब्रुवारी 2025 रोजी साजरी केली जाणार आहे. मान्यतेनुसार, या दिवशी पहिल्यांदा भगवान शंकर शिवलिंगाच्या स्वरुपात प्रकट झाले होते. असं म्हणतात की, महाशिवरात्रीच्या रात्री शिवलिंगात भगवान शंकराचा वास असतो.

महाशिवरात्रीच्या रात्री जे लोक भगवान शंकराचा अभिषेक करतात. त्यांच्या सर्व समस्या भगवान शंकर दूर करतात. त्यानुसार,यंदा निशिता काळात जलाभिषेक करावं.

फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथी 26 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 11 वाजून 08 मिनिटांपासून ते 27 फेब्रुवारी रोजी सकाळी 08 वाजून 54 मिनिटांपर्यंत असणार आहे.

महाशिवरात्रीला निशिता काळात पूजा करावी. याचा शुभ मुहूर्त 26 फेब्रुवारी रोजी रात्री 12.09 पासून 12.59 पर्यंत असणार आहे.

महाशिवरात्रीला प्रथम प्रहर पूजा संध्याकाळी 06.19 पासून रात्री 09.26, दुसरा मुहूर्त रात्री 09.26 ते रात्री 12.34, तिसरा मुहूर्त रात्री 12.34 पासून ते रात्री 03.41 पर्यंत असणार आहे. तर, चौथा मुहूर्त रात्री 03.41 पासून सकाळी 06.48 पर्यंत असणरा आहे.

26 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीच्या दिवशी महाकुंभ मेळ्याचं शेवटचं शाही स्नानदेखील करण्यात येणार आहे.

वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.