बाईकचं ऑइल कधी बदलायचं? गाडीचे हे संकेत लगेच ओळखा

हल्ली प्रत्येकाकडे आपली स्वत:ची बाईक किंवा स्कुटी तरी असतेच

रोजच्या प्रवासात, ऑफिसला जाण्यासाठी किंवा विकेंडला छोट्या ट्रिपसाठी ही बाईक आपल्याला साथ देते.

पण अनेकांना याचं ऑईल कधी बदलायचं किंव नक्की सर्विसिंग कधी करायची हे माहित नसतं.  त्यामुळे बाईकचं इंजिन खराब होतं आणि त्याचा खर्चही जास्त येतो.

मग असं असेल बाईकचं ऑइल बदलण्याची योग्य वेळ कधी असते? चला वाचू

1. इंडिकेशन लाइट इंजिन ऑइल कमी झालं की बाईक डॅशबोर्डवरून इंडिकेशन देते. हे दिसलं की लगेच ऑइल बदला. दुर्लक्ष केल्यास इंजिन खराब होऊ शकतं.

2. इंजिनचा आवाज बाईक चालवताना इंजिन जास्त आवाज करायला लागतंय का? तर हे एक स्पष्ट लक्षण आहे की ऑइल बदलायची वेळ आली आहे.

3. काळा धूर कधी कधी सायलेंसरमधून काळा धूर निघतो. हेही इंजिन ऑइल जुनं झाल्याचं संकेत असतं.

4. ऑइलचा रंग ताजं ऑइल तपकिरी रंगाचं. तर ते जसजसं जुनं होतं, तसतसं काळं आणि घट्ट होतं. थोडं ऑइल बोटावर घेऊन तपासलं तरी ते लक्षात येतं.

5. ऑइल लेव्हल बाईकमध्ये इंजिनशेजारी एक छोटी खिडकी असते. त्यातून ऑइलची पातळी पाहता येते. जर पातळी कमी वाटली तर लगेच नवीन ऑइल टाका