अक्षय शिंदेसोबत शेवटच्या 10 मिनिटात काय घडलं?

बदलापूरमध्ये चिमुकल्या दोन मुलींवर अत्याचार करणारा नराधम अक्षय शिंदेचा गेम झाल्यचां समोर आलंय. 

गोळीबारामध्ये अक्षय शिंदेला गोळी लागून त्याचा मृत्यू झालाय.

आरोपी अक्षय शिंदे याला कारागृहातून पोलीस ठाण्यातून ट्रान्सिट रिमांडसाठी घेऊन जात असताना हा धक्कादायक प्रकार घडला. 

 सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती मिळाली आहे. 

 मुंब्रा बायपास जवळून जात असताना अक्षय शिंदे यानं IPI निलेश मोरे यांची सर्व्हिस रिव्हॉल्व्हर खेचली. 

अक्षयने झाडलेल्यापैकी एक गोळी निलेश मोरे यांच्या पायात लागली. 

2 गोळ्यांचा फायर चुकली आणि त्यानंतर निलेश मोरे यांनी जखमी अवस्थेत अक्षयवर हल्ला केला.

सोबत असलेले दुसरे अधिकारी पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांनी स्वरांक्षणासाठी गोळीबार केला. 

स्वत:च्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हर झाडलेल्या 2 गोळ्या अक्षयवर झाडल्या ज्यात त्याचा मृत्यू झाला.