ऐश्वर्या रायच्या भरजरी लेहंग्याची थेट ऑस्करमध्ये निवड; काय आहे कारणं

ऐश्वर्या रायचा ‘जोधा-अकबर’ हा चित्रपट २००८ मध्ये प्रदर्शित झाला होता.

ऐश्वर्या राय आणि हृतिक रोशन यांनी जोधा-अकबर मध्ये मुख्य भूमिका साकारल्या आहेत.

या चित्रपटातील ऐश्वर्याचा लुक फार चर्चेत आला.

ऐश्वर्याने या भूमिकेत सुंदर लेहंगे, आकर्षित दागिने परिधान केले होते.

इतक्या वर्षांनी ऐश्वर्याने घातलेल्या लेहंग्याची दखल घेण्यात आली.

ऐश्वर्याच्या लेहंग्याची थेट ‘ऑस्कर’ मध्ये निवड झाली.

हा सुंदर लेहंगा ऐश्वर्याने लग्नाच्या सीनवेळी घातला होता.

या लेहंग्याला सुप्रसिद्ध डिझायनर नीता लुल्लाने तयार केले आहे. हा नक्षीदार लेहंगा म्हणजे एक अद्भूत मास्टरपीस आहे.

ऑस्कर म्यूझियमने या सुंदर भारतीय पोशाखाचा त्यांच्या आगामी प्रदर्शनामध्ये समावेश केला आहे.