अभिनेत्री अंकिता लोखंडे हा टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध चेहरा आहे.
अंकिताने टीव्हीसोबत बऱ्याच सिनेमांमध्येही आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे.
अंकिताने मेहनतीच्या जोरावर कलासृष्टीत आपलं नाव कमावलं.
आज अंकिताचा वाढदिवस असून ती 40 वा वाढदिवस साजरा करत आहे.
वाढदिवसानिमित्त तिच्याविषयी खास गोष्ट जाणून घेऊया.
अंकिता लोखंडेचं खरं नाव तुम्हाला माहितीय का?
अंकिताचं खरं नाव वेगळं असून ते फार कमी लोकांना माहित आहे.
अंकिता लोखंडेचं खरं नाव तनुजा लोखंडे आहे.
अंकिताचा जन्म 19 डिसेंबर 1984 रोजी इंदौरमध्ये झाला.
तिने लहानपणापासूनच अभिनेत्री बनण्याचे स्वप्न पाहिलं होतं.