बिग बॉसच्या घरात 'टुकटुकराणी'चा जलवा!
बिग बॉस मराठी ४ मध्ये अभिनेत्री आणि रेडीओ जॉकी यशश्री मसुरकरही सहभागी झाली आहे.
‘बिग बॉस’च्या घरातील सध्या चर्चेत असलेल्या सदस्यांपैकी यशश्री एक आहे.
तिची खासियत म्हणजे ती रिक्षा चालवते. तिच्याकडे 'टुकटुकराणी' नावाची रिक्षा आहे.
‘बिग बॉस’च्या घरात सध्या ती तिची वेगळी ओळख निर्माण करत आहे.
बिग बॉसच्या घरात यशश्रीचा बोल्ड अंदाज पाहायला मिळाला.
या व्हिडिओमध्ये यशश्री स्विमिंगपूलमध्ये बिकिनी घालून पोहताना दिसत आहे.
तिचा हा व्हिडीओ व्हायरल होत असून यावर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत.
यशश्रीने आतापर्यंत मराठीबरोबरच हिंदी मालिकांमध्ये तिने काम केलं आहे.
‘रंग बदलती ओढणी’ मालिकेतील तिने साकारलेली भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती.