ना पॅडी ना अंकिता, अभि दादासोबत सूरज सिद्धिविनायकाला!
गणपती बाप्पावर प्रचंड श्रद्धा असलेला सूरज ट्रॉफी घेऊन घराबाहेर पडला.
घराबाहेर पडल्यानंतर त्याने मुंबईतील प्रभादेवी येथील सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं.
सूरज बिग बॉसची ट्रॉफी घेऊनच दर्शनाला गेला.
ना अंकिता आणि पॅडी दादा, सूरज अभिजीत सावंत बरोबर सिद्धिविनायकाच्या मंदिरात दिसला.
सूरज आणि अभिजीत शेवटपर्यंत बिग बॉसच्या घरात राहिले.
सूरज आणि अभिजीत यांना योग्य सुरक्षा व्यवस्थेत सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी नेण्यात आलं.
सिद्धिविनायकाच्या गाभाऱ्यात जाताच सूरजने हातातली ट्रॉफी बाप्पाच्या चरणी ठेवली.
बाप्पाचा हार त्याने बिग बॉसच्या ट्रॉफीला घातला.
सूरजचा सिद्धिविनायकाच्या मंदिरातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
सूरजला लग्नासाठी कशी मुलगी हवी?