माधुरी दीक्षितचे सगळ्यात जास्त कमाई केलेले ते 8  चित्रपट कोणते ?

बॉलिवूडची धकधकगर्ल माधुरीची ‘मिसेज देशपांडे’ सीरिज लवकरच भेटीला येत आहे.

तिने अनेक हिट चित्रपट दिले आहेत. त्यातील तिचे असे 8 चित्रपट आहेत ज्यांनी बक्कळ कमाई केली आहे.

तिचा टोटल धमाल चित्रपट  2019 मध्ये आला होता.त्याने सगळ्यात जास्त म्हणजेच 150.07 कोटी रुपये कमाई केली होती.

कलंक चित्रपट तिचा 2019 मध्येच रिलीज झाला होता. त्याने बॉक्स ऑफिसवर 80.3 कोटी रुपये एवढी कमाई केली. हा चित्रपट फ्लॉप झाला होता.

‘हम आपके हैं कौन’ हा चित्रपट 1994 मध्ये आला, ज्याने भारतामध्ये 72.46 कोटी रुपये पेक्षा जास्त एवढे कलेक्शन गोळा केले.

तिचा ‘देवदास’ चित्रपट 2002 साली आला होता. तिची चित्रपटात महत्वाची भूमिका होती.  बॉक्स ऑफिसवरती याने 41.65 कोटी कलेक्शन जमवले होते.

‘दिल तो पागल है’1997 ला आलेला हा चित्रपट लोकांच्या खूपच पसंतीस पडला. त्याने 34.97 कोटी एवढी कमाई केली होती.

‘डेढ़ इश्किया’ 2014 मध्ये रिलाज झालेल्या या चित्रपटाने भारतामध्ये 25.27 कोटी एवढी कमाई केली.

माधुरीच्या ‘राजा’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिस वर 20.33 कोटी एवढे कलेक्शन गोळा केले. हा चित्रपट त्या वर्षी ब्लॉकबस्टर ठरला होता.

तिच्या ‘लज्जा’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरती  15.87 कोटी एवढी कमाई केली होती.