2025 चा सर्वाधिक कमाई करणारा मराठी सिनेमा कोणता ?

2025 चा सर्वाधिक कमाई चित्रपट म्हणजे दशावतार सिनेमा आहे.

त्याने बॉक्स ऑफिसवरती पहिल्या दिवसापासून बक्कळ कलेक्शन गोळा केले.

दशावतार चित्रपटाने हिंदीतील बागी 4,द बंगाल फाइल्स यांसारख्या  चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर मागे टाकले आहे.

या चित्रपटात मराठीतील दिग्गज  अभिनेते दिलीप प्रभावळकर आणि महेश मांजरेकर यांनी काम केले आहे.

 5 कोटी रुपये बजेटच्या या चित्रपटाने अंदाजे एकूण 27.55 कोटीपेक्षा जास्त कमाई केली आहे. 

याने 17 दिवसातच 20 कोटी एवढा गल्ला जमवला होता.

हा चित्रपट तळकोकणात सादर केल्या जाणाऱ्या दशावतार लोककलेवर आधारित आहे.

या चित्रपटाचा मुख्य नायक हा बाबुली मेस्त्री (दिलीप प्रभावळकर) जो दशावतार कलावंत असतो, त्याच्या भोवती ही कथा फिरताना दिसते.