एव्हरग्रीन रेखाची एकूण संपत्ती किती?
बॉलिवूडची एव्हरग्रीन अभिनेत्री रेखा. ती आज 71 वा वाढदिवस साजरा करत आहे.
रेखा जास्त सिनेमांमध्ये दिसत नाही, मग एवढा पैसा कुठून कमावते?
रेखाची एकूण किती नटवर्थ आहे याविषयी जाणून घेऊया.
रेखा बॉलिवूडमधील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक होती.
ती एका चित्रपटासाठी सुमारे 14 ते 15 कोटी रुपये घ्यायची.
सिनेमांपासून दूर असूनही, ती इव्हेंट्स, जाहिराती आणि शो प्रमोशन्समधून पैसा कमावते.
रेखा मुंबईतील वांद्रे परिसरात 100 कोटींच्या आलिशान बंगल्यात राहते.
तिच्याकडे महागड्या गाड्यांचं कलेक्शन आहे. ब्रँड एंडोर्समेंटमधूनही ती बक्कळ पैसा कमावते.
रेखाची एकूण संपत्ती सुमारे 330 कोटींपेक्षा जास्त आहे.