माझी तुझी रेशीमगाठ मध्ये येणार मोठ्ठा ट्विस्ट; नेहाचं पालटणार रूप

माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेत लवकरच मोठा ट्विस्ट येणार आहे.

यश आणि नेहा यांच्या अपघातानंतर नेहा बेपत्ता झाली होती.

नेहाचा  कुठेही शोध न लागल्याने चौधरी कुटुंबियांनी तिच्या परतण्याची आशा देखील सोडली होती.

 पण आता मात्र आता मालिकेचं कथानक वेगळंच वळण घेणार आहे. 

आधी साधी भोळी आणि साडी नेसणारी नेहा आता वेस्टर्न ड्रेस मध्ये दिसणार आहे.

नेहाचे काही फोटो समोर आले आहेत. परंतु ही नेहा आता पूर्वीची नेहा राहिलेली नाही.

नेहाचं रूप आता पूर्णपणे पालटलेलं आहे.

त्यामुळे ही नक्की यशची नेहाच आहे का असा मोठा प्रश्न चाहत्यांसमोर उभा राहिला आहे.

मालिकेत आलेल्या या ट्विस्टमुळे आता पुढे काय घडणार हे पाहणं रंजक ठरणार आहे.