तोच ग्रेस, तेच सौंदर्य, 44 वर्षांनी रेखा पुन्हा बनली ‘उमराव जान’!

बॉलिवूडची सदाबहार अभिनेत्री रेखा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

‘उमराव जान’ या आयकॉनिक चित्रपटाच्या री-रिलीजच्या निमित्ताने खास स्क्रीनिंग आयोजित करण्यात आलेला.

या कार्यक्रमात रेखाने तिचा 1981 मधील उमराव जान लूक पुन्हा रिक्रिएट केला.

पांढऱ्या-सोनेरी लेहेंग्यासोबत हेवी दागिन्यांनी तिने सगळ्यांचं लक्ष वेधलं.

तिचा लूक पाहून उपस्थित सेलिब्रिटी आणि चाहते अक्षरशः भारावून गेले.

तिच्या या अंदाजाने सोशल मीडियावर पुन्हा एकदा तिचं कौतुक सुरू झालं.

चाहत्यांनी म्हटलंय, “रेखा अजूनही उमराव जानसारखीच दिसते!”