दुसऱ्या लग्नामुळे चर्चेत, अनिकेतची पहिली बायको कोण?

प्रसिद्ध अभिनेत्री स्नेहा चव्हाण ही लग्नबंधनात अडकली आहे.

मानस असे तिच्या नवऱ्याचे नाव आहे. दोघांनी कोर्ट मॅरेज करत त्यांच्या नात्याला नाव दिले आहे.

स्नेहाचे पहिले लग्न हे अभिनेता अनिकेत विश्वासरावबरोबर झाले होते.

लग्नाच्या 2-3 महिन्यातच त्यांच्यात वाद झाले. स्नेहाने अनिकेत आणि त्याच्या कुटुंबियांवर घरगुती हिंसाचाराचे आरोप करत पैशांची मागणी केली होती.

स्नेहाने अनिकेतच्या आईवर मारहाण करत असल्याचा आरोप केला होता. अनिकेतने मात्र हे सगळे आरोप फेटाळले होते.

स्नेहा ही अभिनेत्री आणि मॉडेल आहे. तिने आतापर्यंत “लाल इश्क”, “हृदयात वाजे समथिंग”, “७०२ दिक्षीत”, “नागपूर अधिवेशन”, “कुसुम मनोहर लेले”, “सिनियर सिटीझन” सारख्या सिनेमात काम केले आहे.