या 5 लोकांसाठी पालक ठरू शकतो ‘विष’,आधीच व्हा सावध!

पालक हे सर्वसाधारणपणे सुपरफूड मानले जाते. यामध्ये असलेले लोह, कॅल्शियम, फायबर आणि जीवनसत्त्वे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत.

पण, काही लोकांसाठी पालक खाल्ल्याने गंभीर नुकसान होऊ शकते हे तुम्हाला माहीत आहे का?

चला जाणून घेऊया त्या 5 कॅटेगरीच्या लोकांबद्दल ज्यांनी पालक टाळावे.

पालकमध्ये ऑक्सलेटचे प्रमाण जास्त असते, जे कॅल्शियमसोबत किडनी स्टोन बनण्याची शक्यता वाढवते. किडनी स्टोनचा त्रास असलेल्या लोकांनी पालक खाणे टाळावे, कारण त्यामुळे त्यांची प्रकृती बिघडू शकते.

ज्यांना यूरिक ऍसिडची समस्या आहे त्यांच्यासाठी पालक हानिकारक ठरू शकतो.पालकामध्ये प्युरिनचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे शरीरातील यूरिक ऍसिडची पातळी वाढते आणि गाउट सारख्या समस्या उद्भवू शकतात.

पालक हा लोहाचा उत्तम स्रोत आहे. मात्र, ज्यांच्या शरीरात आधीच लोहाचे प्रमाण जास्त आहे अशा लोकांनी पालक खाणे टाळावे. आयर्न ओव्हरलोडमुळे यकृत आणि हृदयाच्या समस्या उद्भवू शकतात.

पालकमध्ये व्हिटॅमिन के मुबलक प्रमाणात असते, जे रक्त गोठण्यास मदत करते. परंतु जर एखादी व्यक्ती रक्त पातळ करणारे औषध घेत असेल तर पालकाच्या सेवनाने औषधाचा प्रभाव कमी होतो आणि आरोग्यास हानी पोहोचते.

पालकामध्ये काही घटक असतात जे पोटात गॅस, ॲसिडिटी आणि फुगणे यासारख्या समस्या वाढवू शकतात.

न्यूज18 मराठी या लेखात दिलेली माहिती इंटरनेटवरील वेगवेगळ्या स्त्रोतांकडून गोळा केली गेली आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.