डायबिटिजमध्येही खाऊ शकता या ७ चविष्ट गोष्टी, आताच घ्या जाणून
अनेक मधुमेही रुग्ण मिठाई किंवा गोड पदार्थ खाणे पूर्णपणे सोडून देतात. कारण त्यामुळे रक्तातील साखर वाढू शकते.
मधुमेही रुग्णांना गोड खावेसे वाटत असेल तर ते फळे खाऊ शकतात. परंतु सेवनाच्या प्रमाणावर लक्ष द्या.
मधुमेही रुग्ण स्मूदीचे सेवन करू शकतात, फक्त त्यात साखर वापरू नका फळांचा नैसर्गिक गोडवा घ्या.
जर तुम्हाला हलवा खावासा वाटत असेल तर तुम्ही शुगर फ्री शुगर वापरू शकता. यामुळे रक्तातील साखर नियंत्रित राहते आणि गोड चवही मिळते.
डार्क चॉकलेटमध्ये साखरेचे प्रमाण कमी असते, त्यामुळे मधुमेही रुग्ण त्याचे सेवन करू शकतात. मात्र त्याचे सेवन मर्यादित प्रमाणात करा.
छेना पासून बनवलेली मिठाई मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे.
मधुमेही रुग्णही गूळ आणि मधाचे सेवन करू शकतात पण त्यांच्या प्रमाणावर लक्ष द्या.
जर तुम्हाला गोड ओट्सचे सेवन करायचे असेल तर नाचणी किंवा ज्वारीचे ओट्स खा. यामुळे मधुमेह नियंत्रणात राहील आणि चवही मिळेल.
वरील सर्व बाबी केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून News18 मराठी कोणताही दावा करत नाही. कोणताही उपाय अवलंबण्यापूर्वी डॉक्टरांच्या सल्ला घ्या.