नखांचा रंग सांगतो तुमची फिटनेस? वेळीच व्हा सावध!
नखांचा बदलता रंग आणि आकार तुमच्या शरीरात होणारे बदल आणि आरोग्यच्या समस्येचे संकेत असू शकतात.
नखांचा रंग बदलत असेल तर कोणते आजार असू शकतात, जाणून घ्या.
नखांचा रंग पिवळा होत असेल तर यकृताशी संबंधित समस्या असू शकतात. उदा. हेपेटायटिस, लिव्हर सिरोसिस इत्यादी.
नखांचा पांढरा रंग म्हणजे हृदय किंवा किडनीशी संबंधित समस्यांचे लक्षण असू शकते.
शरीरात कॅल्शिअम किंवा व्हिटॅमिन Dच्या कमतरतेमुळे नखे तुटतात किंवा कमकुवत होतात.
झिंकच्या कमतरतेमुळे नखांवर पांढरे डाग येतात.
नखं काळे-निळे पडत असतील तर शरीरामध्ये ऑक्सिजनची कमतरता असू शकते.
नखांवर रेषा दिसत असतील तर हृदय किंवा शूगरशी संबंधित समस्या असू शकते.
न्यूज18 मराठी या लेखात दिलेली माहिती इंटरनेटवरील वेगवेगळ्या स्त्रोतांकडून गोळा केली गेली आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.