हे २ मसाले छातीतील कफ काढतील बाहेर

हिवाळ्यात लोकांचे आरोग्य बिघडते.

अशा परिस्थितीत बरेच लोक काळीमिरी आणि लवंगापासून बनवलेल्या चहाचे सेवन करतात.

काळीमिरी आणि लवंगाचे सेवन केल्याने अनेक फायदे होतात.

जर तुम्हाला हिवाळ्यात सर्दी आणि खोकल्याचा त्रास होत असेल तर तुम्हाला काळीमिरी आणि लवंगाच्या चहामुळे आराम मिळेल.

खोकला आणि सर्दीपासून आराम मिळण्यासाठी काळीमिरीचा चहा प्यायल्याने कफ बाहेर पडण्यास मदत होते.

जर तुमचे पोट खराब असेल तर लवंग आणि काळीमिरी याचे सेवन केल्याने तुमची पचनक्रिया सुधारते.

लवंग आणि काळीमिरीमध्ये अँटिऑक्सिडंट्स आढळतात, त्यांच्या सेवनाने त्वचा स्वछ राहते.

जर तुम्हाला घसादुखीचा त्रास होत असेल तर लवंगाच्या पाण्याने गुळण्या करा, यामुळे घसादुखीची समस्या दूर होईल.

वरील सर्व बाबी केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून News18 मराठी कोणताही दावा करत नाही. कोणताही उपाय अवलंबण्यापूर्वी डॉक्टरांच्या सल्ला घ्या.