गव्हाच्या गवताचा रस ठरतो अनेक आजारांवर रामबाण उपाय!

गव्हाच्या गवताचा ज्यूसचं महत्त्व आयुर्वेदात सांगितलं गेलं आहे. आरोग्य चांगलं राहवं यासाठी अनेक जण या रस पितात. पण आरोग्य तज्ज्ञांचा सल्ला घेऊन त्याचं सेवन केलेलं कधीही चांगलं.

गव्हाचा गवताच्या रसाचे रोज सेवन केल्याने अनेक समस्यांपासून बचाव होतो. शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्यामुळे आजार आणि आजारांशी लढण्याची ताकद मिळते.

बद्धकोष्ठता, अपचन यांसारख्या समस्या कमी होतात. या रसामध्ये अनेक अँटीऑक्सिडंट्स उपलब्ध असतात. त्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. तसेच शारीरिक थकवा दूर होण्यास मदत होते.

गव्हाच्या गवताचा रस त्वचेचे आरोग्य सुधारण्यास मदत करतो. त्वचेचा टोन सुधारतो आणि सुरकुत्या कमी होतात. तसेच मुरुमांवर नियंत्रण ठेवते. तसेच रक्त शुद्ध करते.

गव्हाच्या गवताचा रस शरीरात धोकादायक कर्करोगाच्या पेशी वाढण्यापासून रोखते. तसेच मधुमेहही नियंत्रणात राहतो, असं आरोग्य तज्ज्ञ सांगतात.

वरील सर्व बाबी केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून News18 मराठी कोणताही दावा करत नाही. कोणताही उपाय अवलंबण्यापूर्वी डॉक्टरांच्या सल्ला घ्या.