डार्क सर्कल दूर करण्याचे १० सोपे उपाय, जाणून घ्या

डोळ्याभोवती थंड दूध लावा आणि १० मिनिटे राहू द्या. थंड दूध हे नैसर्गिक क्लिन्झर आहे, जे काळी वर्तुळे दूर करते.

रात्री टी बॅग पाण्यात बुडवून रेफ्रिजिरेटरमध्ये ठेवा व सकाळी याने डोळ्याला शेक द्या. यामध्ये असलेले कॅफिन सूज दूर करायला मदत करते.

कच्च्या बटाट्याचा रस काढून कापसाच्या साहाय्याने डोळ्यांखाली लावल्याने काळी वर्तुळे दूर होतात.

काकडी गोल आकारात कापून डोळ्यांवर ठेवा. ते त्वचा हायड्रेट करून मुलायम करण्यास मदत करते.

रात्री झोपण्यापूर्वी कोरफडीच्या जेलने डोळ्याखाली मसाज करा, यामुळे डार्क सर्कल कमी होऊ शकतात.

खोबरेल तेलाने डोळ्याखाली मसाज करा आणि रात्रभर राहूद्या.

संत्र्याच्या रसात ग्लिसरीनचे काही थेंब मिसळा आणि १०-१५ मिनिटे डोळ्याखाली मसाज करा.

टोमॅटोमध्ये लिंबाचे काही थेंब मिसळा आणि १० मिनिटे डोळ्याच्या खालील भागावर लावा.

गुलाबाच्या पाण्यात त्वचा उजळवण्याचे गुणधर्म आढळतात, हे १० मिनिटे कापसाच्या साहाय्याने डोळ्याखाली लावा.