Tilted Brush Stroke
खोकल्याने त्रस्त आहात? आरामासाठी हे ५ उपाय करून पाहा
हिवाळ्यात सर्दी आणि खोकल्याचा लोकांना खूप त्रास होतो.
खोकला ही एक सामान्य समस्या आहे जी सर्व वयोगटातील लोकांना होऊ शकते आणि ती सहजासहजी दूर होत नाही.
तुम्हालाही खोकल्याचा त्रास झाला असेल तर आज आम्ही तुम्हाला ५ घरगुती उपाय सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला आराम मिळेल.
कोमट पाण्यात मीठ टाकून गुळण्या केल्याने खोकल्यापासून आराम मिळेल.
पुदिन्यात मेन्थॉल आढळते, जे खोकला कमी करण्यास मदत करते.
आले पाण्यात उकळून मध मिसळून सेवन केल्याने खोकल्याची समस्या कमी होते.
दुधात हळद घालून रात्री झोपण्यापूर्वी गरम करून प्यायल्यानेही खोकला कमी होण्यास मदत होते.
तुळशीच्या पानाचा रस मधासोबत सेवन केल्याने खोकला बरा होतो.
खोकला सर्दीचा अधिक त्रास असेल तर तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या.