हिवाळ्यात दुधात वेलची मिसळून का प्यावे? जाणून घ्या फायदे

जर तुम्हाला शरीर निरोगी ठेवायचे असेल तर तुमच्या आहारात दुधाचा समावेश करा. त्यात जीवनसत्वे आणि खनिजांसह अनेक पोषक घटक असतात.

वेलचीमध्ये नियासिन, व्हिटॅमिन सी, लोह, कॅल्शियम आणि पोटॅशिअम सारखे घटक असतात. जे शरीरासाठी खूप आरोग्यदायी असतात.

पोषणतज्ञ नमामी अग्रवाल सांगतात की, काही लोक हिवाळ्यात दुधात वेलची मिसळून पितात. हे शरीरासाठी फायदेशीर संयोजन आहे, जाणून घ्या त्याचे फायदे.

वेलचीचे दूध पचनसंस्थेला संतुलित ठेवते, यामुळे गॅस, अपचन आणि ऍसिडिटीसारख्या समस्यांपासून आराम मिळतो.

वेलची शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास उपयुक्त आहे. कोमट दुधासोबत घेतल्यास मेटाबॉलिज्म गतिमान होऊन वजन कमी करण्यास मदत करते.

वेलचीमध्ये असे घटक असतात जे मन शांत ठेवण्यास मदत करते, वेलची मिसळून कोमट दूध प्यायल्याने झोप चांगली लागते.

वेलची आणि दुधाचे मिश्रण रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते, ज्यामुळे सर्दी – खोकला या आजारांपासून बचाव होतो.

वेलची आणि मध मिसळलेले दूध लहान बाळांसाठी फायदेशीर आहे, यामुळे पचनशक्ती वाढते व मुलांची भूक वाढते. 

वेलचीचे दूध प्यायल्यास पोटाला थंडावा मिळतो.