घरच्या जेवणात दही असण्याचे १० महत्वाची कारणे!
दही हा भारतीय थाळीचा एक महत्वाचा भाग आहे. तुमच्या ताटात दही असणं म्हणजे तुमचं ताट चविष्ट तर असतेच पण पौष्टिकही असते.
दही हा प्रोबायोटिक्सचा नैसर्गिक स्तोत्र आहे, दह्याचे नियमित सेवन केल्याने पचनक्रिया सुधारते.
उत्तम पचन
रोग प्रतिकारशक्ती वाढवते
दही व्हिटॅमिन सी चा एक उत्तम स्रोत आहे, जो रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करतो.
दातांसाठी फायदेशीर
दही दातांसाठी खूप फायदेशीर आहे. यामध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस मुबलक प्रमाणात असते.
ऊर्जा पातळी वाढते
जर तुम्हाला खूप थकवा जाणवत असेल तर दह्याचे सेवन करावे. हे शरीराला हायड्रेट करून ऊर्जा देण्याचे काम करते.
चमकणारी त्वचा
दह्यामध्ये असणारे लॅक्टिक अॅसिड नैसर्गिक एक्सफोलिएंट म्हणून काम करते, जे त्वचेच्या मृतपेशी काढून टाकण्यात मदत करते.
उच्च प्रथिने
दह्यामध्ये उच्च प्रथिने आढळतात. आपल्या स्नायूंना निरोगी ठेवण्यासाठी प्रथिने आवश्यक असतात.
रक्तदाब नियंत्रण
रोज दही खाल्ल्याने कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते, यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो.
तज्ज्ञांच्या मते तुम्ही सकाळच्या नाश्त्यात फळांसोबत दही खाऊ शकता. याशिवाय दुपारच्या वेळी जेवणात दह्याचे सेवन करू शकता.