अक्रोड खाण्याचे देखील आहेत दुष्परिणाम? कोणी खाऊ नये अक्रोड, जाणून घ्या

अक्रोड हे आरोग्यसाठी सर्वोत्तम ड्रायफ्रुट आहे, मात्र काही लोकांसाठी हे धोकादायक ठरू शकते.

अक्रोडमध्ये जीवनसत्वे, खनिजे आणि प्रोटीन्स भरपूर प्रमाणात आढळतात.

अक्रोड खाल्ल्याने हाडे आणि दात मजबूत होतात.

पचनाची समस्या असलेल्या लोकांनी अक्रोडचे सेवन टाळावे, अक्रोडमध्ये जास्त प्रमाणात फायबर असते ते जास्त प्रमाणात खाल्ल्याने पचनाशी संबंधीत समस्या होतात.

किडनीची समस्या असल्यास अक्रोड खाऊ नये. कोणत्याही प्रकारची ऍलर्जी असल्यास अक्रोडचे सेवन टाळावे.

वरील सर्व बाबी केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून News18 मराठी कोणताही दावा करत नाही. कोणताही उपाय अवलंबण्यापूर्वी डॉक्टरांच्या सल्ला घ्या.