मधासोबत ‘हे’ पदार्थ खाणे टाळा; अन्यथा होईल मोठा तोटा

मधाच्या सेवनाने शरीराला मोठा लाभ होतो. यात एंटीऑक्सीडेंट तत्व असते. त्यामुळे शरीराला जीवाणूंशी लढायला ताकद मिळते. याच्या सेवनाने जखमा देखील लवकर भरतात.

मधात कधीच आंबट फळांचा रस मिक्स करु नये. आंबट फळात एसिड असते. मधात आबंट रस टाकल्यास त्याची चव खराब होते आणि त्याचा परिणाम देखील कमी होतो.

मधात तीव्र गरम पदार्थ जसे दूध, पाणी अशा वस्तू मधात एकत्र करुन सेवन करु नये. तीव्र गरम वस्तू मधात एकत्र केली तर मधाचे पोषकतत्व निघून जाते. आणि ते शरीराला धोकादायक ठरु शकते.

दुधापासून तयार झालेले कोणतेही डेअरी प्रोडक्ट मधात मिक्स करु नयते. उष्णतेने दूधाचे प्रोटीन घट्ट होऊ शकतात. त्याचा स्वाद बिघडू शकतो.

काकडी आणि मध दोन्ही आरोग्यासाठी चांगले आहेत. परंतू या दोघांना कधी एकत्र आणू नये. मध शरीराला गरम राखण्यासाठी खाल्ले जाते. तर काकडी शरीराला थंड करण्यासाठी खाल्ली जाते. दोघांचे एकत्र सेवन पचनक्रिया बिघडवू शकते.

सर्दीत लसूण खुप गुणकारी असतो. परंतू चुकूनही लसूण आणि मध एकत्र करुन सेवन करु नये. त्यामुळे शरीरास नुकसान होऊ शकते.