हे ६ प्रथिनेयुक्त पदार्थ आहेत तुमच्या शरीराचे शत्रू, जाणून घ्या

प्रथिने हे एक आवश्यक पोषक तत्व आहे जे आपल्या शरीराच्या अनेक कार्यांमध्ये मदत करते.

प्रथिने हे स्नायू तयार करणे व दुरुस्त करणे, एन्जाइम, हार्मोन्स आणि इतर महत्वपूर्ण घटकांसाठी काम करते.

परंतु तुम्हाला माहिती आहे का, उत्तम आरोग्यासाठी हे ६ प्रथिनेयुक्त स्रोत टाळावे. जाणून घेऊयात

मांस हा प्रथिनांचा उत्तम स्रोत मानला जातो, परंतु प्रक्रिया केलेले मांस हे आरोग्यसाठी हानिकारक असते.

डीप फ्राय मासांमध्ये ऍक्रिलामाइड नावाचा पदार्थ असतो, ज्यामुळे विशिष्ट प्रकारच्या कर्करोगाचा धोका वाढतो.

हाय-फॅट डेअरी प्रॉडक्टमध्ये कॅलरी अधिक प्रमाणात असते ते सॅच्युरेटेड फॅटने परिपूर्ण असतात, याचे सेवन हृदयाशी संबंधित आजारांचा धोका वाढवते.

प्रोटीन बार्स हे प्रथिनांचा एक उत्तम स्रोत आहे, पण अनेकदा बाजारात मिळणारे प्रोटीन बार्स हे प्रोसेस्ड असतात ज्यात साखरेचे प्रमाण अधिक असते.

दुकानांत उपलब्ध असणाऱ्या फ्लेवर्ड दह्यामध्ये साखर, कृत्रिम फ्लेवर्स आणि प्रिझर्वेटिव्हस असतात, ज्यामुळे ते अस्वस्थ प्रोटीन पर्याय बनतात.

स्नायू तयार करण्यासाठी प्रोटीन पावडरचा वापर केला जातो, परंतु ते डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच घ्यावे. यामध्ये साखर आणि कॅलरीज जस असतात ज्यामुळे अनेक आजारांचा व लठ्ठपणाचा धोका वाढतो.