रोज चेहऱ्यावर दही लावल्याने होतील ‘हे’ फायदे, जाणून घ्या
दही खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यात प्रोबायोटिक्स असतात, जे आतड्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात.
दही आरोग्यासाठीच नाही तर त्वचेसाठीही खूप फायदेशीर आहे. दही फेस मास्क किंवा क्लिन्झर म्हणून वापरता येते.
दह्यामध्ये आढळणारे अँटिऑक्सिडंट्स आणि लॅक्टिक ऍसिड त्वचेवरील रेषा आणि सुरकुत्या कमी करण्यास मदत करतात.
त्वचेवर नियमितपणे दही लावल्याने त्वचा स्वछ आणि चमकदार होते. यामुळे डागही कमी होतात.
दही त्वचेचा कोरडेपणा कमी करण्यास मदत करते आणि त्वचेवर नैसर्गिक ओलावा टिकवून ठेवण्यास मदत करते.
एक चमचा दह्यात एलोवेरा जेल आणि गुलाबपाणी मिसळून चेहऱ्यावर लावल्याने त्वचा मुलायम होते.