स्ट्राबेरी खाण्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहिती आहेत का? जाणून घ्या
अँटिऑक्सिडंट्सने भरपूर असलेली स्ट्राबेरी हे हिवाळ्यासाठी एक उत्तम फळ आहे.
स्ट्राबेरी खाल्ल्याने शरीराची रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते.
स्ट्राबेरीमध्ये आहारातील फायबरदेखील भरपूर असते.
स्ट्राबेरीमध्ये असणाऱ्या फायबरमुळे पचनशक्ती सुधारते.
स्ट्राबेरी हे फळ हिवाळ्यात सहज मिळणारे फळ आहे.
स्ट्राबेरीचे सेवन केल्यास रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित होण्यास मदत होते.
स्ट्राबेरीमध्ये फ्लेव्होनॉइड्स, फिनोलिक फायटोकेमिकल्स आणि इलाजिक ऍसिड हे मुख्य अँटिऑक्सिडंट्स आहेत आणि ते डोळ्यांच्या आरोग्यासाठी चांगले आहेत.
स्ट्राबेरी वजन कमी करण्यास देखील मदत करते. स्ट्राबेरीमधील लेप्टीनमुळे वजन कमी होऊ शकते.
स्ट्राबेरीमध्ये व्हिटॅमिन सी असल्याने त्वचा सुंदर राहण्यास मदत होते.