इम्प्रेस करण्याच्या नादात तुम्ही गंभीर आजाराला द्याल आमंत्रण, परफ्युम वापरताना घ्या काळजी

बाजारात उपलब्ध असलेले बहुतेक परफ्युम बनवण्यासाठी फॅथलेट नावाचे रसायन वापरले जाते, ज्यामुळे अनेक आजार होऊ शकतात.

काही परफ्युममध्ये फॅथलेट आणि एंडोक्राइन डिसप्टर्स नावाची रसायने असतात, ज्यामुळे हार्मोनल पातळी असंतुलित होऊ शकते.

काही संशोधनानुसार, परफ्युममध्ये असलेली ही रसायने हृदयाचा आजारांचे कारण होऊ शकते.

बहुतेक परफ्युममध्ये फॅथलेट्स असतात, जे शरीरात चरबी जमा होण्यास जबाबदार असतात.

परफ्युममध्ये असलेली रसायने गर्भवती महिलांसाठी हानिकारक असतात, ज्यामुळे गर्भपात होऊ शकतो.

फॅथलेट्स असलेल्या परफ्यूमच्या तीव्र वासामुळे, लोकांना तणाव अस्वस्थ किंवा चिंताग्रस्त वाटू लागते.

काही अभ्यासात असे आढळून आले आहे की, फॅथलेट्सच्या संपर्कात आल्याने पुरुषांमध्ये शुक्राणूंची गुणवत्ता कमी होऊ शकते.

परफ्युममध्ये असलेल्या या रसायनांच्या संपर्कात आल्याने रॅशेस आणि त्वचेशी संबंधित इतर समस्या उद्भवू शकतात. 

परफ्यूमच्या काही हानिकारक घटकांमध्ये समाविष्ट असलेल्या रसायनांमुळे श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो.