ब्राऊन की पांढर… कोणतं अंड जास्त पौष्टिक?

अंड्यामध्ये व्हिटॅमिन ए, डी, बी 12, आणि आयरन सारखे अनेक व्हिटॅमिन आणि मिनिरल असतात.

हे पोषकतत्व इम्युनिटी सिस्टम चांगलं ठेवतात. तसेच अनेक प्रकारच्या आजारांवर फायदेशीर ठरतात.

मार्केटमध्ये दोन प्रकारची अंडी मिळतात. एक म्हणजे ब्राऊन आणि दुसरं म्हणजे पांढऱ्या रंगाची अंडी.

अंड्यांचा रंग कोंबडीच्या ब्रीडवर अवलंबून असतो.

तसेच कोंबड्यांचा डायट लेव्हल, स्ट्रेस लेव्हल आणि आजूबाजूचा परिसर अंड्यांच्या कलरला प्रभावित करतो.

तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार ब्राऊन आणि पांढऱ्या रंगाच्या अंड्यामध्ये जास्त फरक नसतो.

दोन्ही पैकी कोणत्याही रंगाच्या अंड्याचे सेवन तुम्ही करू शकता.

ब्राऊन अंड हे पांढऱ्या अंड्यापेक्षा थोडं जास्त जड असतं. तसेच अशा अंड्यात बलक कमी आणि पांढरा भाग अधिक असतो.

पांढऱ्या अंड्याच्या तुलनेत ५० ग्रॅमच्या ब्राऊन अंड्यात ७१ कॅलरी एनर्जी, ६. ३ ग्रॅम प्रोटीन, ०. ३ ग्रॅम कार्बोहायड्रेट असते.

एका अंड्यात ०. ८ mg आयरन, ०. ६ mg झिंक, १५. ४ सेलिनियम, ०. ४ mg व्हिटॅमिन बी १२,  ८० mg व्हिटॅमिन ए आढळते.

बातमी वाचण्यासाठी हेडिंगवर क्लिक करा