चाणक्यनीतीनुसार सतत महिलांच्या जवळ राहणाऱ्या पुरुषांवर काय होतो परिणाम?
आचार्य चाणक्यांनी या चार गोष्टींपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे.
त्या चार सल्ल्यांपैकी एक सल्ला महिलांबाबत आहे.
महान विद्वान आचार्य चाणक्य यांनी चाणक्यनीतीत राजकीय, आर्थिकसंबंधी बरेच सल्ले दिले आहेत.
अगदी वैवाहिक, खासगी आयुष्याबाबत मार्गदर्शन केलं आहे.
अत्यासन्न: विनाशाय दूरस्था न फलप्रदाः | सेव्या मध्यमभावेन राजवह्निर्गुरुः स्त्रियः ||
याचा अर्थ असा की राजा, अग्नी, गुरू आणि स्त्री यांच्याजवळ सतत राहू नका. असं केल्याने मनुष्याला हानी होई शकते.
यांच्याशी व्यवहार करताना व्यक्तीला विचारपूर्वक मधल्या मार्गाचा अवलंब करायला हवा. यालाच मध्यम मार्ग म्हणतात.
मध्यम मार्गाचा अर्थ असा की व्यक्तीला कोणती वस्तू किंवा विचारात ना अधिक गुंतायला हवं, ना त्याचा पूर्णपणे त्याग करावा.
मध्यम मार्गात दोन्ही बाजूंनी थोडं त्याग करून एक मधला मार्ग निवडायचा.