आजकाल अनेकांना निरोगी राहण्यासाठी ब्राऊन ब्रेड खायला आवडते. पण तुम्ही खात असलेली ब्राऊन ब्रेड खरी आहे का? हे कसे समजावे, ते जाणून घेऊयात.
निरोगी राहण्यासाठी आपल्यापैकी बरेच जण पांढऱ्या ब्रेडऐवजी ब्राऊन ब्रेड खाणे पसंत करतात. बाजारपेठेतही त्याची मागणी वाढत आहे.
पण हे ब्रेड तुमच्यासाठी खरोखरच चांगले आहेत का? कारण वाढत्या मागणीमुळे नकली ब्राऊन ब्रेडही बाजारात येत आहे.
आहारतज्ञ शिखा कुमारी यांनी बनावट ब्राऊन ब्रेडचा घोटाळा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
आहारतज्ञ शिखा कुमारी यांनी कॅप्शनमध्ये काही टिप्स दिल्या आहेत ज्यांच्या मदतीने तुम्ही बनावट आणि खरी ब्राउन ब्रेड ओळखू शकता.
स्टोअरमधून ब्रेड खरेदी करण्यापूर्वी, घटकांची यादी काळजीपूर्वक वाचा. सूचीमध्ये जास्त प्रमाणात ऍडिटीव्ह, संरक्षक किंवा कृत्रिम रंग आहेत का ते पहा.
जर तुम्ही स्वतः ब्रेड बनवू शकत नसाल, तर तुमच्या स्वयंपाकात आणि बेकिंगमध्ये संपूर्ण गव्हाचे पीठ वापरा. चपाती, रोटी, पॅनकेक किंवा मफिन बनवण्यासाठी याचा वापर करा.
100% संपूर्ण गव्हाचे पीठ वापरून आणि कारमेल कलरिंग सारखे रसायने टाळून तुमची स्वतःची ब्रेड घरी बनवा. अनेक सोप्या आणि निरोगी गव्हाच्या ब्रेडच्या पाककृती ऑनलाइन उपलब्ध आहेत.