नवरात्री हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे, ज्यामध्ये अनेक लोक नऊ दिवसांचा उपवास करतात. उपवासादरम्यान धान्यांचे सेवन वर्जित असते, पण दूध, दही आणि फळे खाण्याची परंपरा आहे.
अनेक लोकांना प्रश्न पडतो की, उपवास असूनही दुग्धजन्य पदार्थ का खातात? या प्रश्नाचे उत्तर धार्मिक परंपरा आणि आरोग्य विज्ञान दोन्हीमध्ये दडलेले आहे.
धार्मिक मान्यतेनुसार, दूध आणि दुधापासून बनवलेले पदार्थ सात्त्विक मानले जातात, जे उपवासाच्या नियमांमध्ये बसतात. त्यामुळे, उपवासादरम्यान त्यांचे सेवन करणे योग्य मानले जाते.
उपवासात अन्न कमी खाल्ले जाते. अशा वेळी दूध आणि दही शरीराला आवश्यक ऊर्जा देतात. दूधामध्ये प्रोटीन, फॅट्स आणि कार्बोहायड्रेट्स असतात, जे दिवसभर शरीराला सक्रिय ठेवतात.
दही हे एक उत्तम प्रोबायोटिक आहे. उपवासादरम्यान आहार बदलतो, ज्यामुळे पचनसंस्थेवर ताण येऊ शकतो. दही खाल्ल्याने पचन क्रिया सुधारते आणि आतड्यांमधील चांगले बॅक्टेरिया वाढतात.
दूध आणि दही दोन्ही कॅल्शियमचे उत्तम स्रोत आहेत. उपवासादरम्यान हाडांच्या आरोग्यासाठी आवश्यक असलेले कॅल्शियम मिळू शकते.
उन्हाळ्याच्या दिवसांत उपवास करताना शरीर डिहायड्रेट होण्याची शक्यता असते. ताक किंवा दही खाल्ल्याने शरीर हायड्रेटेड आणि थंड राहण्यास मदत होते. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)