अंड खाण्याचे केवळ फायदेच नव्हे तर तोटे देखील; जाणून घ्या अंड खाण्याची योग्य पद्धत
निरोगी आरोग्यासाठी अंड्याचे अनेक फायदे आहेत तितकेच तोटे देखील आहेत.
अंड्यांमध्ये चांगले पौष्टीक घटक आहेत जे शरिराला अनेक फायदे देतात.
पण अंडी खाताना योग्य प्रकारची काळजीदेखील घेतली पाहिजे. कारण अंड्याचे जसे फायदे आहेत तसे तोटे देखील आहेत.
अंडी हे पौष्टिक अन्न आहे आणि त्याची चव सर्वांना आवडते. अंडी हे उच्च दर्जाचे प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजे असलेले अन्न आहे.
व्हिटॅमिन ए, डी, ई, बी12, रिबोफ्लेविन, फोलेट, लोह आणि सेलेनियम यांसारखी विविध जीवनसत्त्वे आणि खनिजे अंड्यांमध्ये आढळतात.अंड्यांमध्ये सर्व नऊ अत्यावश्यक अमीनो ऍसिड असतात, ज्यामुळे ते प्रथिनांचा उत्कृष्ट स्रोत बनतात.
NCBI वर प्रकाशित केलेल्या अभ्यासानुसार (Ref) अंडी खाण्याचे अनेक आरोग्य फायदे आहेत पण अंड्याचे सेवन केल्याने दुष्परिणाम देखील होऊ शकतात. विशेषतः जर तुम्ही जास्त प्रमाणात सेवन करत असाल.
अंड हे प्रत्येकाला पचेलच असं नाही. अंडी खाल्यानं अनेकांना पोटात त्रास होतो. पचन संस्था बिघडेत आणि अनेक समस्या निर्माण होतात.
कच्ची किंवा कमी शिजलेली अंडी खाल्ल्याने साल्मोनेला बॅक्टेरियाचा धोका होऊ शकतो. या जीवाणूमुळे अतिसार, ताप आणि पोटात पेटके यांसारखी लक्षणे दिसू शकतात.
अंड्यामुळे ऍलर्जी होणं ही समस्या दुर्मिळ आहे. पण या समस्येची लक्षणे सौम्य किंवा गंभीर असू शकतात. यामुळे त्वचेवर एक्जिमा किंवा सूज येण्याचा धोका असतो.