किचनमधील चिकट खिडक्या मिनिटांत स्वच्छ करा, जाणून घ्या कसं

गणेशोत्सव झाला, नवरात्र झाली, दसरा झाला आता लवकरच दिवाळीचा सण येतोय.

दिवाळी हा सण जवळ आल्यानंतर एक गोष्ट अनेकांना खूपच त्रासदायक वाटते, ती म्हणजे दिवाळीची साफसफाई. 

किचनमधील खिडक्या कालांतराने चिकट होऊ लागतात. अशा खिडक्या स्वच्छ करणे हा एक टास्क आहे. 

आज आम्ही तुम्हाला अशा काही हॅक सांगणार आहोत, ज्यामुळे तुमचं हे काम खूपच सोपं होईल.

तासंतास या खिडक्या स्वच्छ करण्याच्या जागी या ट्रिक्स वापरून तुम्ही काही मिनिटांमध्येच हे काम आटपू शकता. 

मिठामध्ये लिंबाचा रस मिसळून हे मिश्रण खिडक्यांना लावल्यास त्यावरील चिकट थर लगेच निघून जातो. 

किचनच्या खिडक्या स्वच्छ करण्यासाठी रबिंग अल्कोहोलचा वापर केल्यास खिडक्यांवरील काळपटपणा निघून जातो. 

बेकिंग सोडा आणि हायड्रोजन पेरोक्साइड खिडक्यांना लावून खिडक्या ब्रशने स्वच्छ कराव्यात. 

चिकट खिडक्यांवर साबणाचे पाणी आणि व्हिनेगार हे मिश्रण वापरल्यास त्या लगेच स्वच्छ होतात.

लक्षात ठेवा, खिडक्या स्वच्छ करताना हातात ग्लोव्ह्स घालावेत. यामुळे हातांना इजा होत नाही.