घराच्या या दिशेला पाणी ठेवणे अशुभ!
वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये पाण्याचे स्थान उत्तर आणि उत्तर-पूर्व दिशेलाच असावे. असे केल्याने घरात सुख, समृद्धी आणि आर्थिक लाभ लाभतात.
वास्तूनुसार ग्लासात पाणी सोडणे किंवा प्यायल्यानंतर फेकून देणे हा मोठा दोष आहे. गरजेनुसार नेहेमी ग्लासात पाणी घ्यावे.
तुमच्या घरात बेडरूमच्या वर कधीही पाण्याची टाकी बनवू नये. असे केल्याने व्यक्ती मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होऊ शकतो आणि नैराश्याने ग्रस्त होऊ शकतो.
वास्तूनुसार स्वयंपाकघरात गॅस शेगडीजवळ पाण्याची टाकी बांधू नये. पाणी ठेवण्याची जागा उत्तर – पूर्व दिशेलाच असावी.
वास्तूनुसार घराच्या पूर्व किंवा उत्तर दिशेला पाण्याची टाकी किंवा बोरिंग बनवावे. ब्रम्हस्थानात चुकूनही बनवू नये.
घराच्या छतावर ईशान्य, दक्षिण – पश्चिम किंवा आग्नेय कोपऱ्यात कधीही पाण्याची टाकी बांधू नये. वास्तूनुसार असे करणे अशुभ मानले जाते.