उन्हाळ्यात नाकातून रक्त आल्यास त्वरित करा हे उपाय.. 

जर तुम्ही झोपलेले असाल तर रक्तस्त्राव थांबवण्यासाठी उठून बसा आणि डोकं वर करा. 

असे केल्याने रक्तस्त्राव काही मिनिटांतच थांबतो.

कोरडेपणा दूर ठेवण्यासाठी सलाईन थेंब वापरा.

घरामध्ये ह्युमिडिफायर चालू ठेवल्यास उत्तम.

WebMD च्या मते, नाकातून रक्तस्त्राव होत असल्यास स्वतःला शांत ठेवा.

कधीकधी घाबरल्यामुळे किंवा नव्हर्सनेसमुळे नाकातून रक्तस्त्राव होण्याची समस्या ट्रिगर होऊ शकते. 

रक्तस्त्राव थांबल्यानंतर नाकात बोट घालणे टाळा.

कोरडेपणा दूर करण्यासाठी तुम्ही नाकात पेट्रोलियम जेली लावू शकता.

जर ही समस्या पुन्हा पुन्हा होत असेल तर नक्कीच तुमच्या डॉक्टरांशी बोला.