सकाळची सुरुवात ५ पदार्थांपासून चुकूनही करू नका, जाणून घ्या कारणं

सकाळच्या वेळी खाल्ले जाणारे पदार्थ आपल्या संपूर्ण दिवसभराच्या आरोग्यावर परिणाम करीत असतात. काही पदार्थांना सकाळी खाल्ल्याने आपल्या आरोग्याचे नुकसान होऊ शकते.

कॉफी – कॉफीमध्ये कॅफीन असते. जे आपल्या शरीराला अलर्ट करीत असते. रिकाम्या पोटी जर कॉफी पिली तर आपल्याला एसिडीटी होण्याची शक्यता असते. तसेच ब्लड शुगर लेव्हल देखील प्रभावीत होऊ शकते.

मिठाई – सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी गोड पदार्थ खाल्ल्याने आपल्या शरीरातील साखर वाढू शकते. त्यामुळे काही वेळाने पुन्हा भूक लागते.

फळे – फळे आरोग्यासाठी चांगले असते. परंतू रिकाम्या पोटी फळे खाण्यापासून वाचले पाहीजे. विटामिन्स सी अधिक असूनही जर सकाळी रिकाम्या पोटी फळे खाल्ली तर पोटाच्या आत जळजळ होऊ शकते.

तळलेले पदार्थ – तळलेले पदार्थांमध्ये फॅट आणि कॅलरी जास्त असते.जी आपल्या पचन यंत्रणेला प्रभावित करीत असते. या खाद्यपदार्थांना पचविणे कठीण असते.

दही – दह्यामध्ये प्रोटीन आणि कॅल्शियमचे प्रमाण प्रचंड मोठे असते. परंतू रिकाम्या पोटी सकाळी दही खाण्याने पोटात एसिडीटी होऊ शकते.