अवेळी चहा पिणं म्हणजे आजाराला आमंत्रण? 99 टक्के लोक करतात ही चूक
भारतात अनेकजण चहाप्रेमी आहेत. चहाप्रेमी लोकांना दिवसभरातून कमीतकमी तीन ते चार वेळा चहा पिण्याची सवय असते.
चहा शरीरात एनर्जी आणण्यासाठी महत्वाची असली तरी चुकीच्या वेळी चहा प्यायल्याने अनेक आजारांना आमंत्रण मिळू शकते.
काहीजण चहाचे इतके शौकीन असतात की सकाळी उठल्याबरोबर त्यांना दुधाचा चहा प्यायला लागतो. भारतात बरेच चहाप्रेमी सकाळी उठल्यावर रिकाम्यापोटी किंवा नाश्ता केल्यावर चहा पितात.
सकाळी रिकाम्यापोटी चहा पिणे हे आरोग्यासाठी अतिशय हानिकारक ठरू शकतं.
रिकाम्यापोटी चहा पिणे वयोवृद्ध लोकांसाठी खूप घातक ठरू शकत. याचा हृदयावर वाईट परिणाम होऊ शकतो आणि त्यांना ऍसिडिटीचा त्रास देखील होऊ शकतो.
चुकीच्या वेळी चहा प्यायल्याने अशक्तपणा, थकवा, दम लागणे इत्यादी समस्या जाणवू लागतात.
भारतात बरेचजण दुधाची चहा पितात. परंतु दुधाची चहा आरोग्यासाठी चांगली नसते. बरेचजण चहा बनवताना हीच चूक करतात परंतु दुधाची चहा प्यायल्याने शरीराला आयरन मिळत नाही आणि यामुळे एनीमियाचा धोका वाढतो.
तुम्हाला चहा पिण्याची सवय असेल तर दुधाच्या चहा ऐवजी तुम्ही तुळस, ग्रीन टी, हर्बल टी किंवा कॅमोमाइल टी सारख्या चहाचा आहारात समावेश करू शकता. यामुळे तुमची पचनक्रिया देखील चांगली राहते आणि इम्यूनिटी सुद्धा वाढते.
वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. News18 मराठी यातून कोणताही दावा करत नाही.