बीटरूट रसाचे सेवन आरोग्यासाठी हानिकारक? जाणून घ्या सत्य

जेव्हा एखाद्याचे रक्त कमी होते, तेव्हा बहुतेक लोक बीटरूटचा रस पिण्याचा सल्ला देतात, परंतु ते जास्त प्रमाणात प्यायल्याने फायद्या ऐवजी आरोग्यास हानी होऊ शकते.

बीटरूट फोलेटचा चांगला स्रोत आहे. म्हणजे B9, मँगनीज, पोटॅशियम, लोह आणि व्हिटॅमिन सी. त्यात प्रथिने, फायबर तसेच इतर अनेक संयुगे असतात.

जर तुम्ही देखील अशा लोकांपैकी असाल जे दररोज बीटरूटचा रस पितात, तर याचे प्रमाण मर्यादित ठेवा, अन्यथा काही आरोग्य समस्या उद्भवू शकतात.

बीटरुटचा रस जास्त प्यायल्याने बीटुरिया होऊ शकतो. 

यामध्ये लघवीचा रंग गुलाबी किंवा लाल दिसू शकतो. काळजी करण्यासारखे यात काही नाही.

परंतु जर तुम्हाला सूज किंवा वेदना जाणवत असेल तर डॉक्टरांशी संपर्क साधा.

जर तुम्ही बीटरूटचा रस अधिक प्रमाणात प्यायला तर ते शरीरात ऑक्सलेटचे प्रमाण वाढवू शकते, ज्यामुळे किडनी स्टोन होण्याची शक्यता वाढते.

जास्त प्रमाणात बीटरूट रस प्यायल्याने रक्तदा कमी होऊ शकतो, म्हणून ज्या लोकांना आधीच रक्तदाबाची समस्या आहे त्यांनी बीटरूट रस पिणे टाळावे.

जास्त प्रमाणात बीटरूट रस प्यायल्याने पोट फुगणे, मळमळणे यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.