फ्रोजन वाटणे की शेंगांचे वाटणे, नेमकं काय वापरावं?
बऱ्याचदा आपण जेवणात वाट्याण्याचा वापर करतो, पण कधी ते ताजे वाटणे आपण वापरतो तर कधी फ्रोजन. पण नेमका प्रश्न असा नेमकं वापरावं काय आणि कधी?
ताजे वाटाणे: यात नैसर्गिक गोडवा अधिक असतो, जो चवीसाठी उत्तम आहे.
फ्रोजन वाटाणे: हे पिकल्यावर लगेच गोठवले जातात, त्यामुळे त्यांचे पोषक मूल्य टिकून राहते.
ताजे वाटाणे: शेंगा सोलण्यासाठी आणि वापरण्यासाठी जास्त वेळ लागतो. पण लगेच भाजी करून खाण्यासाठी उत्तम पर्याय.
फ्रोजन वाटाणे: हे आधीच तयार असल्याने, वापरायला अत्यंत सोपे आणि जलद असतात. इन्स्टंट यूजसाठी बेस्ट.
ताजे वाटाणे: हे केवळ ठरलेल्या हंगामात उपलब्ध होतात, त्यामुळे नेहमी मिळत नाहीत. आणि काही दिवसात खराब होतात.
फ्रोजन वाटाणे: हे वर्षभर सहज उपलब्ध असतात आणि साठवून ठेवणे सोपे आहे. वर्षभर साठवून ठेवले तरी पोषण आणि न्यूट्रियंट्स कमी होत नाहीत.