फ्रूटस विरुद्ध ड्राय फ्रूटस, काय खाल्ल्याने शरीराला मिळते ताकद?

फळे आणि सुका मेवा हे दोन्ही पोषक तत्वांचे भांडार आहेत, दोन्हीचे सेवन आपल्या शरीरासाठी फायदेशीर आहे.

काही लोक निरोगी राहण्यासाठी फळे खातात तर काहींना ड्राय फ्रूटस खायला आवडतात.

अशा परिस्थितीत फळे की ड्रायफ्रुटस खाल्ल्याने शरीराला अधिक ताकद मिळते असा प्रश्न उपस्थित होतो.

फळांमध्ये अधिक पाणी आणि ताजेपणा असतो. त्यात भरपूर जीवनसत्वे, खनिजे आणि फायबर असतात, ज्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते.

तर ड्रायफ्रुटस मध्ये पाण्याचे प्रमाण कमी असले तरी ते त्यात पोषक तत्वे जास्त असतात. सुक्या मेव्यामध्ये प्रथिने आणि निरोगी फॅट असतात.

एकीकडे फळे खाल्ल्याने हाडे, त्वचा आणि रोगप्रतिकारक शक्ती सुधारते, तर दुसरीकडे नट्स खाल्याने हृदय, मेंदू आणि पचनसंस्था मजबूत राहते.